Perfect Writer
Ashvini Kishor (B.Ash)
About The Author
"वेदकिर्ती" हा Ashvini Kishor (B.Ash) यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. यात नवोदित कवीं सारखा नवखेपणा आहे. कारण हा अश्विनी यांचा पहिलाच प्रयत्न आहे. तरीही त्यांनी योग्य तो न्याय दिला आहे.
मूळ गावं बारामती असूनही गेली अनेक वर्षे केरळ राज्यातील कोझिकोडे येथे वास्तव्य असलेल्या अश्विनी यांचे मराठी भाषेवरील प्रेम, प्रभुत्व तसूभरही कमी झालेले नाही. "मराठीशी अतूट नाते " असं म्हणत मराठीशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली आहे.अश्विनी ह्या अतिशय विनम्र ,प्रेमळ , कुशाग्र बुध्दीमत्ता आणि मराठी भाषेवरील असामान्य प्रभुत्व असणारं दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे.त्या प्रतिभावंत लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांच्या वाचक ते लेखक होण्याच्या प्रवासाची मी साक्षीदार आहे. त्यांचे अनेक लेख , कविता या वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या आहेत. लेखनाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रासोबत जोडल्या गेलेल्या आहेत.त्यांचे अनेक लेख,कथा, ललित लेखन, कविता माझ्या वाचनात सतत येत असतात.त्यांचा हा प्रवास वाखाणण्याजोगा आहे.